कंकणद्वीप
कंकणद्वीप : बांगडीसारखे, जवळजवळ वर्तुळाकार प्रवाळद्वीप. याच्या आतल्या बाजूस २० ते १०० मी. खोलीचे, सपाट तळाचे खारकच्छ असून त्याभोवती लहान लहान प्रवाळद्वीपांचे वर्तुळ बनलेले असते. त्यातून खारकच्छात शिरण्यास खोल पाण्याचा मार्ग असतो. कंकणद्वीपे समुद्रांच्या उबदार पाण्याच्या भागात, विशेषतः पॅसिफिक व हिंदी महासागरांत आढळतात. ती जवळजवळ समुद्रसपाटीतच असतात; काहींची उंची सु. ५ मी. पर्यंत असते.